बेळगाव / प्रतिनिधी
वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार बेंगळूर - धारवाड ते बेळगाव पर्यंत वाढविण्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीनुसार वंदे भारत एक्सप्रेस आता बेळगाव पर्यंत धावणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रेल्वे क्रमांक (२०६६१) बेंगळूर स्थानकातून सकाळी ५.४५ वा. सुटेल आणि दुपारी १.३० वा. बेळगावला पोहोचेल. रेल्वे क्रमांक (२०६६२) बेळगावहून दुपारी २ वा. सुटेल आणि रात्री १०.१० बेंगळूर स्थानकावर पोहोचेल. श्रीघरा येथे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेची तारीख निश्चित केली जाईल. बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या विनंतीला प्रतिसाद दे, रेल्वेची व्यवस्था केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाचे त्यांनी आभार मानले.
0 Comments