- ६.७९ लाखाच्या १४ दुचाकी जप्त
- खडेबाजार पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
खडेबाजार पोलीस स्थानकच्या हद्दीत १८ जून रोजी झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणी आंतरराज्य चोरट्यांच्या त्रिकुटाला अटक करण्यात खडेबाजार पोलिसांना यश आले आहे. महेश निंगाप्पा मदार (वय २३ मूळचा रा. कुरबरदिनी ता.कोल्हार ; सध्या रा. अथर्गा ता. इंडी जि. विजयपूर) ,अमीर बाबू एळगी (वय १९) व प्रशांत मोरे (वय २१) दोघेही रा.अथर्गा ता. इंडी विजापूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ लाख ७९ हजार किंमतीच्या १४ दुचाकी जप्त कऱण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सदर चोरट्यांनी बेळगाव, गोवा, अथणी, विजयपूर आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. त्यांच्याकडून १ टीव्हीएस अपाचे, २ बजाज पल्सर एनएस , ५ हिरो होंडा स्पलेंडर, २ होंडा शाईन, १ बजाज प्लॅटिना,१ हिरो होंडा स्पलेंडर प्रो याशिवाय अन्य दोन अशा एकूण १४ दुचाकींचा समावेश आहे.
जप्त केलेल्या दुचाकींमध्ये खडेबाजार पोलीस स्थानक हद्दीत ४, अथणी पोलीस स्थानक हद्दीत १ चोरलेल्या दुचाकींचा समावेश आहे. तर इतर जप्त केलेल्या गाडी मालकांचा शोध सुरू आहे. पोलिस उपायुक्त स्नेहा व सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई करून दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एस. सिद्धरामप्पा यांनी चोरीचा यशस्वी तपास केलेले अधिकारी आणि खडेबाजार पोलिसांचे कौतुक करून त्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
0 Comments