बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून बिलाच्या रक्कमेसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या फेऱ्या मारून कंटाळलेल्या एका कंत्राटदाराने कार्यकारी अभियंत्यासमोर विष पिऊन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बेळगावच्या किल्ला परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोबर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. नागप्पा बांगी या असे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोबर यांच्यासमोरच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विष प्राशन केले. या घटनेनंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत प्राप्त माहितीनुसार ठेकेदार नागाप्पा बांगी यांना २०२२ मध्ये कंत्राटी पद्धतीने हलगा ते तिगडी गावापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मिळाले होते. ६ लाख ५० हजार रुपयांचे काम ठेकेदाराने यापूर्वीच पूर्ण केले आहे. मात्र काम पूर्ण करूनही कार्यकारी अभियंता बील देण्यास टाळाटाळ करत होते. बीलाची रक्कम न मिळाल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा नागप्पा बांगी यांनी दिला होता. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आज आत्महत्येचा प्रयत्न केला.
0 Comments