खानापूर / प्रतिनिधी 

उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा गांधीग्राम पुरस्कार यंदा खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे. सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी बेंगळूर मध्ये झालेल्या सोहळ्यात ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पंचायत विकास अधिकारी नागप्‍पा बन्नी, सभापती मोहिनी येळळूरकर, उपाध्यक्ष शबाना मुजावर आणि इतरांनी हा पुरस्कार स्वीकारला.  

खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता आणि ग्रामविकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने या ग्रामपंचायतीला गांधीग्राम पुरस्काराने सन्मानित करून विकासात सहकार्य करण्यास प्रोत्साहित केले आहे.

याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सचिव महांतेश खनगावी, सदस्य यल्लाप्पा गुरव, गजानन पाटील, गुणवंत तळवार, संजय कोलकार, परशुराम मडवाळकर, नामदेव कोलकार, रूक्माण्णा झुंजवाडकर, गंगू तळवार, ज्योती गुरव, नूतन भुजगुरव आणि बेकवाड ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.