- विजयपूर शहरातील कलादगी ओणी येथील घटना
विजयपूर / वार्ताहर
शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. विजयपूर शहरातील कलादगी ओणी येथील एपीएमसी पोलीसस्थानकाच्या हद्दीत दादापीर मुजावर यांच्या घरी ही घटना घडली.
आग लागली तेव्हा घरात कोणीही नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या घटनेत टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटरसह वस्तू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी दादापीर मुजावर यांनी केली आहे.
0 Comments