खानापूर / प्रतिनिधी
नंदगड (ता. खानापूर) येथे बुधवार दि. १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या जनता दर्शन कार्यक्रमात बोगस डॉक्टर संदर्भात तक्रार आल्याने, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुन्नादुल्ली, तालुका आरोग्य अधिकारी कीडसन्नावर यांनी नंदगड येथे कोणतीही पदवी नसताना बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू करून औषधोपचार करणाऱ्या मकतुम मालदार नावाच्या बनावट डॉक्टरच्या क्लिनिकला भेट दिली व त्याच्या दवाखान्याची तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये केपीएमई नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे क्लिनिकला नोटीस बजावण्यात आली व तीन दिवसात नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.
0 Comments