बेळगाव / प्रतिनिधी 

राकसकोप (ता. बेळगाव) येथे  नवरात्री निमित्त म.  ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले यांच्याहस्ते  श्री दुर्गादेवीचे पूजन करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आर. एम. चौगुले यांचा मानाचा भगवा फेटा बांधून श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील आबालवृद्ध आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.