खानापूर / प्रतिनिधी 

बेंगळूरहून गोव्याच्या दिशेने वैद्यकीय साहित्य घेऊन निघालेल्या टेम्पोची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर टेम्पोतील अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले. 

धारवाड - पणजी मार्गावर नागरगाळी वनविभाग विश्रामगृहानजीक आज सोमवारी सकाळी ८ वा. लोंढा पोलीस स्थानकाच्या हद्दीतही घटना घडली. सय्यद निजाम ( वय १९, रा. बेंगळूर) असे मृत टेंपो चालकाचे नाव आहे. तर मजार शेख (वय १९) व तोहिर शेख दोघेही (रा. बेंगळूर) हे युवक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर टेम्पो चालक निजाम सय्यद यांचा मृतदेह वाहन अडकला होता. यानंतर घटनास्थळी क्रेन मागवून तो बाहेर काढण्यात आला.