- अपघातात वाहनांचे मोठे नुकसान
- बेळगाव पांगुळ गल्ली येथील घटना
- अपघातादरम्यान तिन्ही वाहनांची विद्युत खांबालाही धडक
- ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित
बेळगाव / प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारची धडक बसून एक रिक्षा आणि चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात तिन्ही वाहनांची नजीकच्या विद्युत खांबाला धडक बसली आणि खांबावरील ट्रान्सफॉर्मर खाली पडून त्याचा स्फोट झाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथे आज शनिवारी सकाळी ६ वा. सुमारास हा अपघात झाला. अपघातात कारसह ऑटो रिक्षा आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच खडेबाजार व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
0 Comments