नवरात्रीच्या पहिल्या माळेला केशरी रंगाच्या साड्या परिधान
करून पारंपारिक मराठमोळ्या पेहरावात माऊली महिला
भजनी मंडळ शास्त्रीनगरच्या सर्व सदस्या 
(फोटो सौजन्य : माऊली महिला भजनी मंडळ,
        शास्त्रीनगर बेळगाव)

नवरात्री २०२३ : भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ रंग हे याच एकात्मतेचे प्रतीक आहेत.हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा - अर्चा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग नवरात्र कोणत्या दिवसापासून सुरू होते यावर आधारित असतो.यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज रविवार दि. १५ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇


नवरात्रीच्या पहिल्या माळेला केशरी रंगाच्या साड्या परिधान
करून पारंपारिक पेह
रावात ताशिलदार गल्लीतील 
सौ. रेश्मा राजू बाद्रे समवेत इतर महिला 

रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३  : पहिली माळ 

रंग : केशरी (नारंगी)

रंगाचे महत्त्व : केशरी रंग हा क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असल्यामुळे केशरी रंग शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे असे मानले जाते. हा रंग पावित्र्याशी जोडलेला आहे.

 (१) 
नवरात्रीच्या पहिल्या माळेला केशरी रंगाची साडी
परिधान करून 
हातात केशरी ध्वज घेतलेल्या
पारंपरिक वेशभूषेतील सौ .
रेखा शंकर कलखांबकर 

 (२) 
  
नवरात्रीच्या पहिल्या माळेला केशरी रंगाची साडी
परिधान करून 
हातात पुष्पपरडी घेतलेल्या 
पारंपरिक वेशभूषेतील सौ .
रोशनी रविराज हुंदरे