बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ४ ते १५ डिसेंबर दरम्यान बेळगाव येथील सुवर्णसौध मध्ये होणार आहे.या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान डिसेंबर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेत हॉटेल संघटनेची बैठक पार पडली.या बैठकीत मनपा आयुक्त अशोक दुडगंटी यांनी, अधिवेशन काळात कोणतीही तक्रार येऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत हॉटेल मालकांना सूचना केली. दि. ४ ते १५ डिसेंबर या काळात बेळगाव येथे अधिवेशन घेण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  काळातील हॉटेलमध्ये सर्व आरक्षण रद्द करण्याची सूचनाही अशोक दुडगुंटी यांनी केली आहे.