बेळगाव / प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास बेळगावकरांनी देखील आपला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात क्रांती घडवू पाहणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास बेळगाववासियांनी महाराष्ट्रात जाऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्तेचे कार्यकर्ते राजू मोरे, सुनील मुरकुटे, विवेक कुट्रे आणि महिला आघाडीच्या रेणू रेणू मोरे हे महाराष्ट्रात धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वडे बुद्रुक येथे गेले असता तिथे स्थानिक ग्रामस्थांसमवेत त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनात फक्त सहभागी न होता राजू मोरे व इतरांनी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
उद्या होणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य बेळगावकर महाराष्ट्रात गेला की आपल्या भावना व्यक्त करतच असतो हेच यावरून स्पष्ट होते. एकंदर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा असा दुहेरी संगम बेळगावकरांनी तुळजापूर येथील वडे बुद्रुक गावात साधला.
0 Comments