- सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केल्या भावना
- मिरज येथे नवरत्न दिवाळी अंक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात
मिरज / प्रतिनिधी
आईच्या स्मरणार्थ पुरस्कार अन् विविध व्यक्तींचा सन्मान हे कार्य प्रेरणादायी असल्याच्या भावना सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केल्या, ज्येष्ठ नागरिक संघ मिरज येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नवरत्न दिवाळी अंक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संगीता महसकर,नवरत्न संपादक प्रा. प्रकाश कुलकर्णी ,अंजली गोखले , किसन म्हैसाळे (वय १०५ वर्षे) व पुरस्कार प्राप्त रूपाली सचिन गाडवे आदि मान्यवर उपस्थित होते.
साई प्रकाशन व नवरत्न परिवार मेळावा यांच्या संयुक्त विद्यमाने नवरत्न दीपावली अंक (वर्ष २१ वे) या अंकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. अंजली गोखले व विद्या बेल्लारी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संगीता महसकर यांच्या शुभहस्ते पार पडले.
ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी, स्मृती पुरस्कार रश्मी रविंद्र फलटणकर (मिरज), आदर्श शिक्षिका उषा अनिरुद्ध कुलकर्णी (मिरज) तर ज्येष्ठ साहित्य सेवा पुरस्कार जयश्री सुभाष देश कुलकर्णी (पुणे). समाजसेवा पुरस्कार रूपाली सचिन गाडवे, सामजिक व साहित्य सेवा पुरस्कार विजय बकशी, कथापुरस्कार पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई, फंटूश बाल कलाकार अवनिश महेंदे, उत्कृष्ठ वेशभूषा तर वर्धन कुलकर्णी चित्रकलेतील गुणवंत बालक यांना मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्पूर्वी दिवंगताना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संदेश वाचन, पाहुण्यांचा परिचय, स्वागत, पुरस्कार, सन्मानपत्रांचे वाचन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
शेवटी पवन जोशी यांनी आभार मानले. धनंजय पाठक,अंजली गोखले, मुग्धा गोखले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. वैशाली गद्रे,अलका प्रकाश कुलकर्णी, विद्या बेल्लारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या कार्यक्रमाला सांगली, मिरज, पुणे,आदि भागातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments