- गोकाक तालुक्याच्या एलपट्टी गावातील घटना
गोकाक / वार्ताहर
अतिक्रमण भूमापनासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोकाक तालुक्यातील एलपट्टी ग्रामस्थांनी दगडफेक करून वन व पोलीस विभागाच्या वाहनांसह खासगी वाहनांचे नुकसान केले. या घटनेत गोकाकच्या आरएफओसह वनविभागाचे पाच कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत वनरक्षक वाहन, एक पोलिस वाहन आणि दोन खाजगी वाहनांसह १० हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले.
खनगाव आरक्षित वनपरिक्षेत्रातील सर्वे नं. ४७७, ७१८/अ आणि ५८०अ मधील ५०० एकर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे कर्मचारी अतिक्रमण झालेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. यावेळी ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. वाद वाढला आणि गावकऱ्यांनी दगडफेक केली. त्यामुळे गोकाक पोलीस स्थानकात ३० हून अधिक जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
0 Comments