- जन्मदात्या आईसह पाच जणांना अटक
विजयपूर / वार्ताहर
पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केलेल्या निर्दयी आईसह पाच आरोपींना अटक करण्यात आली. विजयपूरच्या एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली.
आई श्रीदेवी यककुंडी, प्रकाश गोल्लर, राहुल गोल्लर, राघवेंद्र साठे , संतोष बिदरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांनी मल्लिकार्जुन यककुंडी याचा निर्दयपणे खून केला होता.
या घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार मल्लिकार्जुन यककुंडी याला दारूचे व्यसन होते. रोज दारूच्या नशेत तो स्वतःची आई श्रीदेवी हिला त्रास देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून आई श्रीदेवी हिने पोटच्या मुलाच्या हत्येसाठी सुपारी दिली. आरोपींनी मल्लिकार्जुन यांची हत्या करून त्याचा मृतदेह विजयपूर मधील गांधीनगर नजीकच्या खाणीत फेकून दिला. यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेची नोंद विजयपूर एपीएमसी पोलीस स्थानकात झाली असून मुलाच्या हत्याप्रकरणी आईवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments