बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या नावाने तीन बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याची  धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.  महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात जनतेने अशा बनावट खात्यांबाबत सावधगिरी बाळगावी असे आवाहन  त्यांनी केले आहे.