बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेतील महापौरांची स्वाक्षरी असलेली फाईल गहाळ त्याचबरोबर नियमबाह्य दुरुस्ती याबाबत प्रशासन आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू होती. या वादाने आता गंभीर वळण घेतले असून महापौर शोभा सोमनाचे आणि राज्यपालांना पत्र लिहून महापालिकेतील प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी मुदत मागितली आहे. आज महापालिकेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाची बैठक बोलाविण्यात आली होती. आमदार अभय पाटील हे दलित अधिकाऱ्यांवर दबावतंत्र अवलंबत आहेत. महानगरपालिकेतील करवाडी बाबत महापौरांच्या स्वाक्षरीची फाईल गायब आहे. याबाबत उत्तर मतदारसंघातील आमदारांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर शोभा सोमनाचे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.
बेळगाव महापालिकेच्या दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिका आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा शिरफारसीचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. हा ठराव एससी, डीपीएआर आणि टीओपीटी या खात्यांकडे पाठविण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्यास बेळगाव महापालिका बरखास्त केली जाईल असे वक्तव्य करताच सत्ताधारी नगरसेवकातून खळबळ उडाली आहे.
0 Comments