बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव व्यावसायिक कर विभागाच्या सहआयुक्त द्राक्षायणी चौशेट्टी २५ हजारांची लाच स्वीकारताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
जीएसटी संदर्भातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी विकास कोकणे यांच्याकडून २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावर कोकणे यांनी लोकायुक्त पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती . त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचून आज कोकणे यांच्याकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली.
0 Comments