नवरात्रीच्या सहाव्या माळेला हिरव्या रंगाच्या साड्या 
परिधान करून पारंपरिक वेशभूषेत सुळगा (हिं.) येथील
आदिशक्ती मुक्ताई भजनी महिला मंडळाच्या  सर्व सदस्या

नवरात्री २०२३ : नवरात्री उत्सव हा चैतन्यपूर्ण रंगांचा जल्लोष असतो आणि तो या उत्सवाच्या आरास पोशाख आणि रांगोळ्यांमध्ये आपल्या सभोवती दिसून येतो. या नवरात्रीच्या रंगांचे काय वैशिष्ट्य आहे याबाबत नवल वाटले नां? आपले डोळे दिपवून टाकणाऱ्या या रंगांच्या मागे परंपरा संस्कृती आहे. दुर्गादेवीची नऊ रुपये नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्या पाच माळांना अनुक्रमे केशरी, पांढरा, लाल, निळा आणि पिवळा या रंगांचे महत्त्व आपण पाहिले आहे.

नवरात्रीच्या  सहाव्या माळेला हिरव्या रंगाची साडी परिधान 
करून पारंपारिक पेहरावात सौ. निकिता निलेश कलखांबकर 
फोटो सौजन्य : 
सौ. निकिता निलेश कलखांबकर,
सुळगा (हिं.)

शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ : सहावी माळ

आजचा रंग : हिरवा

रंगाचे महत्त्व :

हिरवा रंग हा हिरवळीचे समृद्धीचे तसेच भरभराटीचे प्रतीक आहे. तसे पाहायला गेले तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे. कारण या पृथ्वीवरील झाडे झुडपे वृक्ष आधी सर्व निसर्गाची संपदा ही हिरव्या रंगातच असलेली दिसून येते. हिरवा रंग हा आपल्या मनात प्रफुल्लितता, शांतता, आनंद निर्माण करण्याचे कार्य करतो.