बेळगाव / प्रतिनिधी
कुटुंबाच्या चरितार्थला हातभार लावण्यासाठी बेळगावात येऊन राहिलेल्या पेपरविक्री करणाऱ्या एका अल्पवयीन मुलगा विद्युतभरीत तारेच्या स्पर्शाने गंभीर जखमी झाला. आज शनिवारी सकाळी ९.४५ वा. सुमारास ही घटना घडली. रजत गौरव (वय १४ रा. मूळचा उ. प्रदेश ; सध्या रा.रघुनाथ पेठ अनगोळ) असे त्या पेपर विक्री करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, रजत गौरव हा हिंदवाडी परिसरात दररोज सकाळी पेपर विक्रीचे काम करत होता.आज शनिवारी सकाळी ही नेहमीप्रमाणे पेपर टाकून तो, गोमटेश जवळून भाग्यनगर कडे जाणाऱ्या मार्गावरील एका बंगल्यात पेपर टाकण्यासाठी गेला. त्यावेळी अन्य कामासाठी बंगल्यात गेल्यानंतर त्याला बंगल्याच्या आवाराच्या जाळीतून वाहणाऱ्या वीज प्रवाहाचा जबर धक्का बसला. सदर घटनेत रजत गौरव हा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिस आणि रजतचे कुटुंबिय तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजितची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments