- तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील शेतकरी विरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे.मागील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरूकरण्यात आलेल्या अनेक योजना बंद पाडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम काँग्रेस सरकार करत आहे. याच्या निषेधार्थ खानापूर तालुका भाजप रयत मोर्चाच्या वतीने आज भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या दुष्काळी परिस्थिती असताना खानापूर तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश न करता या तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळण्यात आले आहे. शिवाय काँग्रेसच्या कुटिल धोरणामुळे शेतकऱ्यांना सात वीजपुरवठ्या ऐवजी केवळ दोन ते तीन तास वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भाजप सरकारच्या काळातील अनेक लोकोपयोगी योजना आजही अंमलात आल्या असल्या तरी त्या बंद पडण्याचे कारस्थान काँग्रेस सरकार करत आहे. या विरोधात खानापूर तालुका भाजप प्रयत्न मोर्चाच्या वतीने विराट मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
या विराट मोर्चाचे नेतृत्व खानापूर तालुका रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश किरवीर यांनी केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments