• गोकाक ग्रामीण पोलिसांची कारवाई 


गोकाक / वार्ताहर 

शेतातील पंपसेट चोरीचा यशस्वी तपास करून चौघांना अटक करण्यात गोकाक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सुमारे १ लाख ५० हजार रु. किंमतीचे ६ विद्युत पंपसेट व चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी  असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार मेलवणकी हद्दीतील नदी काठावर असलेल्या शेतातून एकूण सहा पंपसेट चोरीला गेल्याची तक्रार पामपासे मालकांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे तपास करून  गोकाक पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. गोकाक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आय ए. डी.घोरी, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक किरण मोहिते, अंकलगीचे पोलिस उपनिरीक्षक शिवानंद मन्नीकेरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने  शनिवारी सकाळी ही कारवाई केली. चोरीचा यशस्वी तपास केलेल्या पोलीस पथकाचे बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखांनी कौतुक केले आहे.