- जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी अभिनव उपक्रम
- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती
- जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या स्थानिक पातळीवर सोडविण्याच्या उद्देशाने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे २६ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय "जनता दर्शन" होणार आहे. आज शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी जनता दर्शनच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले, दि. २६ सप्टेंबर रोजी केपीटीसीएल भवन, नेहरू नगर, बेळगाव येथे सकाळी ११ वाजता जनता दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हास्तरावर जनतेच्या तक्रारींवर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे ,आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता दर्शन घेण्यात यावे,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात २६ सप्टेंबर रोजी जनदर्शन होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात जिल्हा पालक मंत्र्यांसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
0 Comments