• रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव व खानापूर वगळता बेळगाव जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. तेव्हा बेळगाव व खानापूर तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा या मागणीसाठी रयत संघटनेच्यावतीने आज शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. 

कर्नाटक सरकारने यापूर्वीच बेळगाव जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. मात्र त्यात प्रामुख्याने बेळगाव व खानापूर तालुक्याचा समावेश केलेला नाही. बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पेरणी केलेली भात, बटाटा, कॉर्न, कोबी, रताळी  आदी पिके योग्य पावसाअभावी सुकून जात  आहेत. जर शेतकऱ्याला हे बियाणे पेरायचे असेल तर त्याची सर्व मेहनत शेतातील खत आणि बियाणे व्यर्थ गेल्यासारखे आहे. परिणामी शेतकऱ्याचे जगणे कठीण बनले आहे. त्यामुळे सरकारने बेळगाव आणि खानापूर तालुका हे दोन्ही तालुके दुष्काळी भाग म्हणून घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे, आठवडाभरात हा परिसर दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

यावेळी काळगौडा पाटील, बसवराज पाटील, वैजू लुमाचे, पर्वतगौडा पाटील, बसवराजा डोंगरगावी यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.