सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथील  गणपत गल्लीच्या सार्वजनिक श्री बाळ गणेश युवक मंडळातर्फे बुधवार दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी  सार्वजनिक  गणेशोत्सवासाठी मंडप मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष - विक्रम (हरि) जोतिबा जाधव, उपाध्यक्ष - संतोष बाळू पाटील, यांच्यासह मंडळाचे सदस्य गल्लीतील महिला व भाविक उपस्थित होते.

लाडक्या बाप्पाचे आगमन आता अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. शहरासह तालुक्यातही सर्वांना आता बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर  तालुक्याच्या विविध गावांमध्ये मुहूर्तमेढ पूजन करून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीला प्रारंभ करण्यात येत आहे.