बेळगाव / प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. सर्व समाज सरकारच्या पाठीशी असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरकारमधील लिंगायत अधिकाऱ्यांची स्थिती वाईट असल्याच्या वीरशैव नेते शामनूर शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हेब्बाळकर यांनी शामनूर शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पूर्वी लिंगायत समाज काँग्रेस सोबत नसल्याची तक्रार होती ती तक्रार आता नसल्याची माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली.
शामनूर शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षातील जेष्ठ मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
0 Comments