• लाखो रुपयांचा कापूस जळून खाक
  • विजयपूर शहरातील घटना  

विजयपूर  / वार्ताहर 

कापसाच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. विजयपूर शहरातील इंडी मार्गावर विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत  श्रीलक्ष्मी कॉटन इंडस्ट्रीयलच्या गोदामात भीषण आग लागल्याने ही दुर्घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला होता.

या घटनेची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.