बेळगाव / प्रतिनिधी
समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची प्रवासी बस रस्त्यानजीक पलटी होऊन आठ प्रवासी जखमी झाले. अलारवाडनजीक राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवारी सकाळी हा अपघात झाला.
याबाबत घटना स्थळावरून प्राप्त माहितीनुसार बस क्रमांक (केए 22- एफ- ५०८) ही प्रवासी भरून केके कोप्पहून बेळगावला येत होती. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यानजीक पलटी होऊन आठ प्रवास जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण वीस प्रवासी होते यामधील एका युवतीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उत्तर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी केली. तसेच अपघातात जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद बेळगाव उत्तर विभाग वाहतूक पोलीस स्थानकात झाली आहे.
0 Comments