बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकात जनतेसाठी महत्त्वकांक्षी योजना राबविण्याचे वचन देऊन हमीभावाच्या जोरावर सत्ता मिळवलेल्या काँग्रेस सरकारला काही दिवसांपूर्वीच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यामध्ये निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच हमी योजनांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी पहिला टप्प्यात सुरू झालेल्या शक्ती योजनेच्या अंमलबजावणीला आज बुधवार दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी यशस्वीपणे १०० दिवस पूर्ण झाले आहेत.
‘शक्ती’ योजना ही महिलांसाठी बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठीची योजना आहे. या १०० दिवसांत एकूण ६२.५५ कोटी महिला प्रवाशांनी बस प्रवासाचा लाभ घेतला असून प्रवास भाडे म्हणून १४५६ कोटी रु. जमले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ११ जून रोजी बेंगळूर विधानसौधसमोर ‘शक्ती’ योजनेचा शुभारंभ केला होता.
योजना सुरू झाल्याच्या पहिल्या दोन महिन्यात विक्रमी संख्येने महिलांनी प्रवास केला. परंतु ऑगस्ट महिन्यात महिलांचे प्रवास करण्याचे प्रमाण काहीसे घटले.शक्ती योजनेअंतर्गत केएसआरटीसी, बीएमटीसी, केकेआरटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ६२.५५ (६२,५५,३९,७२७) कोटी महिलांनी चार महामंडळाच्या बसमधून प्रवास केला असून त्या सरकारच्या योजनेच्या लाभार्थी आहेत.
0 Comments