बेळगाव / प्रतिनिधी

रामतीर्थ नगर येथील एका खुल्या जागेत नवजात मृत पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर येथे  भरवस्तीत आज सकाळी पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. यानंतर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची बेळगाव शहर परिसरात चर्चा सुरू होती.

या घटनेची माहिती मिळताच माळ मारुती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.रामतीर्थ नगर परिसरात मोकळ्या जागेत रान व झुडपे वाढलेली आहेत. याचाच फायदा घेत  अज्ञात व्यक्तींनी  हे अर्भक फेकून दिले होते. या प्रकारानंतर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. माळ मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून याप्रकरणी माळ मारुती पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा -