हुक्केरी / वार्ताहर
गणेशोत्सव काळात हुक्केरी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांतता अबाधित रहावी याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील भागात आज गुरुवार दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांनी संचलन केले. पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी या संचलनात सहभाग घेतला होता.
हुक्केरी शहरात सुमारे ३५ सार्वजनिक गणेश मूर्तींचे प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज हजारो लोक गणेश दर्शनासाठी येत असतात. यातच यंदा ईद-ए-मिलादचा सणही आला असल्याने पोलिसांनी विशेष पथक तयार करून शांतता भंग होऊ नये यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. शहरात शांतता भंग करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे त्यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले.
यावेळी संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण आवजी, पी.एस. नरसिंहराजू, अभिषेक अक्कतंगेरहाळ, मंजुनाथ कब्बूरी तसेच होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक संचलनात सहभागी झाले होते.
0 Comments