- हारूगेरीतील घटना
रायबाग / वार्ताहर
खून करून तरुणाचा विहिरीत टाकल्याची घटना हारुगेरी (ता. रायबाग) नजीक उघडकीस आली.कामप्पा कोंचीकोरव (वय १७, लाळ्यानकोडी, विजयपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार कामप्पा हा गावोगावी केस गोळा करून त्याची विक्री करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. काही दिवसांपूर्वी तो मित्रासमवेत हारूगेरी येथे केस गोळा करण्यासाठी आला होता. त्यावेळी येथील त्या समाजातील काही तरुणांबरोबर त्याचा वाद झाला. 'आमच्या गावात केस का गोळा करत आहेस,' यावरून वाद झाला होता. त्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला होता.
दरम्यान माहिती मिळताच मंडळ पोलीस निरीक्षक रवींद्रन बडपकीरप्पगोळ व उपनिरीक्षक गिरीमल्लप्पा उप्पार यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद हारूगेरी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments