बेंगळूर  दि. १५ सप्टेंबर २०२३ 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राज्य पोलीस विभागाने सुरू केलेल्या  अभिनव आणि पर्यावरणास अनुकूल अशा ईएफआयआर सुविधेचा बेंगळूर येथे  शुभारंभ केला. यावेळी राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

'ई-एफआयआर' सुविधा म्हणजे काय? 

'ई' -एफआयआर नावाची पेपरलेस सुविधा नागरिकांना वाहने चोरीस गेल्यावर एफआयआर दाखल करण्यास मदत करेल. त्यामुळे नागरिकांना एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकात जावे लागणार नाही. या सुविधेमुळे संबंधित प्रकरणाची माहिती घरबसल्या उपलब्ध होईल.

याआधी वाहने चोरीला गेल्यानंतर नागरिकांना पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंदवावी लागत होती. मात्र ईएफआयआर सुविधेमुळे वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे. नागरिकांना ईएफआयआर नोंदविण्यासाठी राज्य पोलीस विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन तिथे सिटीझन डेस्क निवडावा लागेल. वाहनाचा नोंदणी क्रमांक नमूद केल्यानंतर संकेतस्थळावर आपोआप वाहनाची संपूर्ण माहिती भरण्यात येईल आणि त्यानंतर एफआयआर नोंदविला जाईल.

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत फॉरेन्सिक विरोधी विकसित केलेल्या तांत्रिक संशोधन अहवालाचे अनावरण केले आणि ई - चलन सुविधेचाही शुभारंभ केला. मात्र १ नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव दिनी ई - चलन सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.