बेळगाव / प्रतिनिधी
दागिने चोरी प्रकरणी एकाला अटक करून २ लाख ५५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले. अब्दुल गनी शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट रोजी शहरातील एपीएमसी पोलीस स्थानकात रघुनाथ पाटील यांच्या घरी झालेल्या घरफोडीत सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विश्वनाथ कन्नूरी आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने दोन गुन्ह्यांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीचा यशस्वी तपास केलेल्या पोलीस पथकाचे शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.
0 Comments