- अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू
- बेलूरनजीक राष्ट्रीय महामार्गावर धारवाडच्या हद्दीत दुर्घटना
धारवाड / वार्ताहर
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, नागराज आणि गंगाधर हे दोघे तरुण दुचाकीवरून नरेंद्र गावानजीक टेकडीवरील बसवाणा मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान देवदर्शनाहून परतताना राष्ट्रीय महामार्गावर धारवाडच्या हद्दीत बेलूरनजीक आले असता अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर या दोघांचेही मृतदेह राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही कडेला पडलेल्या अवस्थेत होते.
घटनेची माहिती मिळताच गरग पोलीस स्थानकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. या घटनेची गरग पोलिस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments