- डॉ. भीमाशंकर गुलेद बेळगावचे नवे जिल्हापोलिस प्रमुख
बेळगाव / प्रतिनिधी
राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून एकूण ३५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांची ही सर्वात मोठी बदली प्रक्रिया आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सरकारी आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. यामध्ये बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी आयपीएस डॉ. भीमाशंकर गुलेद यांची बेळगाव जिल्हापोलिस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत डॉ. भीमाशंकर गुलेद आयपीएस (केएन-२०१२), पोलीस उपायुक्त पूर्व विभाग, बेंगळूर शहर हे बेळगाव जिल्हापोलिस प्रमुख डॉ. संजीव एम पाटील यांच्या जागी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
तर बेळगाव जिल्हापोलिस प्रमुख डॉ. संजीव एम. पाटील यांची पोलीस उपायुक्त व्हाईट फिल्ड विभाग, बेंगळूर शहर म्हणून आयपीएस एस. गिरीश यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ते या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
- बदली झालेले अधिकारी आणि त्यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाणपुढीलप्रमाणे :
1. अनुपम अग्रवाल (मंगळूरच्या आयुक्तपदी बदली)
2 डॉ. एस. डी. शरणप्पा (डीआयजीपी, म्हैसूर पोलीस अकादमी)
3. वर्तिका कटियार (एसपी आयएसडी, बेंगळूर)
4. कार्तिक रेड्डी (डीसीपी, दक्षिण वाहतूक विभाग, बेंगळूर)
5. संतोष बाबू (डीसीपी, प्रशासकीय विभाग, बेंगळूर)
6. यतीश चंद्र (एसपी आयएसडी, बेंगळूर)
7. भीमा शंकर गुळेद (एसपी, बेळगाव)
8. निकम प्रकाश अमृत (एसपी, वायरलेस विभाग)
9. राहुल कुमार शाहपूरवाड (डीसीपी, बेंगळूर दक्षिण विभाग)
10. डी. देवराजू (डीसीपी, पूर्व विभाग, बेंगळूर)
11. अब्दुल अहद (डीसीपी, सेंट्रल डिव्हिजन, बेंगळूर)
12. संजीव पाटील (डीसीपी, व्हाईटफिल्ड)
13. एस. गिरीश (डीसीपी, पश्चिम विभाग, बेंगळूर)
14. परशुराम (एसपी, गुप्तवार्ता, बेंगळूर)
15. एच.डी. आनंद कुमार (एसपी, संचालक नागरी हक्क आणि अंमलबजावणी संचालनालय)
16.सुमन डी. पानेकर (एआयजीपी, मुख्यालय)
17. डेक्का किशोर बाबू (एसपी आणि प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, कलबुर्गी)
18. लक्ष्मण निंबरगी (एसपी, क्राईम रेकॉर्ड ब्युरो, बेंगळूर)
19. डॉ. अरुण (एसपी, उडुपी)
20. मोहम्मद सुजीता (एसपी, हसन)
21. जयप्रकाश (एसपी, इंटेलिजन्स, बेंगळूर)
22. शेखर एच. थेक्कनवर (डीसीपी, सीसीबी-1, बेंगळूर)
23. सारा फातिमा (डीसीपी, पूर्व वाहतूक विभाग बेंगळूर)
24. सोनवणे ऋषिकेश भगवान (एसपी, विजयपुर)
25. लोकेश भरमप्पा (एसपी, पोलीस अकादमी, म्हैसूर)
26. श्रीनिवास गौडा (डीसीपी, सीसीबी-2, बेंगळूर)
27. कृष्णकांत (एआयजीपी, प्रशासन बेंगळूर)
28. अमरनाथ रेड्डी (एसपी, बागलकोट)
29. हरिराम शंकर (एसपी, इंटेलिजन्स)
30. अद्दुरु श्रीनिवासुलू (एसपी, कलबुर्गी)
31. अंशु कुमार (एसपी, कोस्टल सिक्युरिटी फोर्स)
32. कनिका सिक्रीवाल (डीसीपी, कायदा व सुव्यवस्था
33. अंशु कुमार (एसपी, कोस्टल सिक्युरिटी फोर्स)
34. कनिका सिक्रीवाल (डीसीपी, कायदा व सुव्यवस्था विभाग, कलबुर्गी)
35. कौशल चौकसी (सहसंचालक, FSL)
36. रवींद्र काशिनाथ गडादी (एसपी, इंटेलिजन्स)
37. डॉ. वंशकृष्ण (डीसीपी, कमांड सेंटर, बेंगळूर)
0 Comments