बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला होता. यामध्ये पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. (कायदा व सुव्यवस्था विभाग) यांचा समावेश होता. त्यांच्या जागी बेळगावचे नूतन कायदा सुव्यवस्था पोलीस उपायुक्त म्हणून रोहन जगदीश यांची नियुक्ती केली.
त्यानुसार पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांच्या बदलीनंतर आज बुधवारी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पदभार स्वीकारला. रोहन जगदीश हे (केएन - २०१९) बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
0 Comments