चित्रदुर्ग / वार्ताहर 

भरधाव कारची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील चौघेजण जागीच ठार झाले.शमशुद्दीन (वय ४०), मल्लिका (वय ३७), खालील (वय ४२) आणि तबरेज (वय १३) चौघेही (रा. तुमकूर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कार होस्पेटहून तुमकूरकडे निघाली होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक बसून अपघात झाला.

या अपघातात अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चित्रदुर्गच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.