मण्णूर दि. ३ सप्टेंबर / विनय कदम
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम यांचा उत्कृष्ट समाजसेवक म्हणून सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र धर्मस्थळ बेळगाव जिल्हा घटकच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात विनय विलास कदम यांना श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धीचे जिल्हा संयोजक सतीश नाईक यांच्याहस्ते पुष्यहार घालून तसेच शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सतीश नाईक म्हणाले, विनय कदम यांचे समाजकार्य,समाजासाठी योगदान व कार्यतत्परता ही वाखाणण्याजोगी आहे. कोणतीही योजना तळागाळापर्यंत पोहोचविताना कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही. सरकारी असो किंवा खाजगी कोणत्याही योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यात विनय कदम महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. म्हणूनच आम्ही आज धर्मस्थळ बेळगाव जिल्हा घटक च्या वतीने त्यांचा उत्कृष्ट समाजसेवक म्हणून सत्कार केला असे त्यांनी सांगितले. तसेच विनय कदम यांनी समाजासाठी असेच योगदान देत राहावे, या कार्यासाठी आम्ही सदैव त्यांच्याबरोबर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0 Comments