बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील अधिकारी श्रीकांत इराळे यांची महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी आज रुग्णालयात भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गोवावेस येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला काल बुधवारी सकाळी मनपा उपयुक्त रेश्मा तालिकोटी यांनी अचानक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. बैठक चालू असताना महसूल निरीक्षक श्रीकांत इराळे यांची तब्येत बिघडली आणि ते खाली कोसळले.तातडीने त्यांना वेणूग्राम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच आज गुरुवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी नगरनियोजन स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी, वीणा विजापुरे व नगरसेवक उपस्थित होते.
0 Comments