- गळफास घेऊन संपविले जीवन
बेळगाव / प्रतिनिधी
हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गृहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बोगेनगरकोप्प (ता. कलघटगी ; जि. बेळगाव) गावात ही घटना घडली. सुमंगला थिपण्णावर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार काल शनिवार दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा सासरच्या घरात सुमंगला हिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पाच वर्षांपूर्वी सुमंगला हिचा प्रवीण थिप्पण्णावर याच्याशी विवाह झाला होता. विवाह नंतरही सासरच्या मंडळींकडून तिचा हुंड्यासाठी छळ होत होता. त्यामुळे सुमंगलाच्या आत्महत्येनंतर संशय निर्माण झाला आहे. तर आमच्या मुलीची हत्या करून तिने गळफास घेतल्याचे भासविण्यात आल्याचा आरोप सुमंगलाच्या माहेरच्यांनी केला आहे.
या घटनेची नोंद कलघटगी पोलिस स्थानकात झाली असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.
0 Comments