- बुडा व महापालिकेचा नोंदविला निषेध
- मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
देवराजअर्स कॉलनी बसवण कुडची येथील रहिवाशांनी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षा विरोधात आंदोलन केले. यावेळी संतप्त रहिवाशांनी महापालिकेचा प्रतिकात्मक पुतळा जाळून संताप व्यक्त केला.
१९८२ स्थापन करण्यात आलेली देवराज अर्स कॉलनी गेल्या ४० वर्षांपासून कोणत्याही विकासाशिवाय मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील रहिवाशांना खराब रस्ते, ड्रेनेजची असुविधा, पाणी समस्या आदि समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत आमदार - खासदार यांच्यासह महापालिकेला निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. तेव्हा येत्या पंधरा दिवसात सर्व मूलभूत सुविधा न पुरविल्यास बागलकोट राष्ट्रीय महामार्ग बंद करणार असल्याचे देवराज अर्स वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले.
0 Comments