सुळगा (हिं.) / वार्ताहर
क्रीडा विभाग व सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे तुरमुरी (ता. बेळगाव) घेण्यात आलेल्या उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेत सुळगा (हिं.) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती, संचलित ब्रह्मलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे.
सांघिक खो-खो खेळामध्ये मुला मुलींच्या संघाने प्रथम तर थ्रो बॉल मध्ये मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
वैयक्तिक खेळ : गणेश कोवाडकर, १०० मी. धावणे (प्रथम क्रमांक), नम्रता मंडलिक गोळाफेक (प्रथम क्रमांक), प्रेम बंडू सांगावकर ८०० मी. धावणे (द्वितीय क्रमांक), अतुल पाटील १०० मी. धावणे (द्वितीय क्रमांक), सुशांत पाटील गोळा फेक मध्ये (तृतीय क्रमांक), प्राची मनोहर पाटील ३००० मी. आणि ४०० मी. धावण्यात (तृतीय क्रमांक) प्राप्त केले आहेत. यशस्वी संघ आणि विद्यार्थ्यांचे शेतकरी शिक्षण सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह, ब्रह्मलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments