बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्याच्या मुदलगी तालुक्यातील खानट्टी आणि शिवापुर परिसरात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. 

शिवापुर गावातील ऊस, मका व मोकळ्या जागेत बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच एका ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले आहेत. खबरदारी म्हूणून बिबट्याचा वावर असलेल्या भागात फिरू नये आणि शेतात जाऊ नये असा इशारा वनविभागाने दिला आहे.