- हरसनवाडीनजीक खानापूर पोलिसांची कारवाई
खानापूर / प्रतिनिधी
कत्तलखान्यासाठी म्हशींची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना खानापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.हरसनवाडी (ता. खानापूर) नजीक ही कारवाई करण्यात आली. अल्ताफ इब्राहिम कादोळी (वय ३८), शिराज अलिसाब बुद्धिहाळ (वय ३३) दोघेही रा. संपगावी ता. बैलहोंगल अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ३ लाख ३५ हजार रु. किमतीच्या वाहनासह १२ म्हशी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी दोघांवर भादवि १८७/२०२३ कलम क्रमांक ४, ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी ९ वा. सुमारास १२ म्हशींची एका कंटेनर मधून चोर्ला मार्गे गोव्याला कत्तलखान्याकडे बेकायदा वाहतूक केली जात होती. दरम्यान ही बातमी समजताच खानापूर पोलिसांनी खानापूर जांबोटी दरम्यान हरसनवाडीनजीक कंटेनर अडवून त्या १२ म्हशींना जीवदान दिले. खानापूरचे पोलीस निरीक्षक गिरीश एम. यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments