• आर्थिक व्यवहारातून केला होता हल्ला 

खानापूर / प्रतिनिधी 

लोंढा येथे ब्लेडने वार करून दोघांना जखमी केल्याच्या आरोपाखाली अन्य दोघांना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे.आसिफ जमादार व उमर शेख दोघेही (रा. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अल्तमेश नाईक व इरफान सुभानी (दोघेही रा.लोंढा) यांच्यावर लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना बेळगाव येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, क्रिकेट सट्टेबाजीच्या आर्थिक देवाणघेवाणीत लोंढा गावातील तरुणाने रक्कम देणे बाकी होते. याबाबत विचारण्यासाठी बेळगाव येथील तीघेजण लोंढा येथे गेले होते. त्यावेळी वाद होऊन हा ब्लेड हल्ला झाला. या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.