बेळगाव / प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बेळगाव - दिल्ली थेट विमानाचे बुकिंग सुरू झाले आहे. बेळगाव ते नवी दिल्ली अशी इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे.
विमान नवी दिल्लीहून दुपारी ३.४५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६.०५ वाजता बेळगावला उतरेल. २ तास २० मिनिटे प्रवास वेळ. बेळगावहून संध्याकाळी ६.३५ वाजता निघून रात्री ९ वाजता दिल्लीला पोहोचेल.
दिल्ली – बेळगाव ५२९४ आणि बेळगाव – दिल्ली ४७१९ तिकीट भाडे. कर वेगळा आहे. पूर्वी बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा होती. प्रवाशांची संख्याही पुरेशी होती. पण एका एकी उड्डाण रद्द करून हुबळीहून सुरू झाली. आता पुन्हा बेळगावहून विमानसेवा सुरू होत आहे.
बेळगाव- दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी लोकसभा सदस्य अण्णासाहेब जोल्ले आणि राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी खूप प्रयत्न केले होते.
0 Comments