• देवस्की पंच कमिटीच्या बैठकीत ठराव 

मण्णूर दि. ३ ऑगस्ट / विनय कदम 

मण्णूर (ता. बेळगाव) येथील  कलमेश्वर मंदिर नव्याने बांधण्याचे ठरविण्यात आले आहे. बुधवार दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ठीक ८ वा. देवस्की पंच कमिटी चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंदिरा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मंदिर नव्याने बांधण्याचा निर्णय घेऊन देवस्की पंच कमिटीच्या वतीने ठराव करण्यात आला. 

तसेच आज गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजता सर्व देवस्की पंच कमिटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सेक्रेटरी व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत कलमेश्वर मंदिराकडे जाऊन पाहणी करण्यात आली. तिथे मंदिराबाबत सर्वानी आपपली मते  मांडली व मंदिर कसे पूर्णत्वास न्यावे याचा आराखडा नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. सर्वानी एकमताने मंदिर पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वाटचालीस सुरुवात करण्यात आली. 

याप्रसंगी मण्णूर ग्रामस्थ व देणगीदार सर्व देवस्की पंच कमिटी मण्णूर उपस्थित होते. उपस्थितांचे देवस्की पंच कमिटीच्यावतीने चेअरमन मुकुंद तरळे यांनी आभार मानले.