बेळगाव / प्रतिनिधी
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगाव विभाग, औषध नियंत्रण विभाग, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी बेळगाव हिंदवाडी येथील महावीर भवन येथे सकाळी ८ ते २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे जितोचे अध्यक्ष मुकेश पोरवाल यांनी सांगितले.
बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून जितो संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून सर्व शिबिरे अतिशय यशस्वीपणे पार पडली आहेत. हे रक्तदान शिबिर विविध संस्था, समाजसेवी संस्था, औद्योगिक संस्था व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने व त्यांच्या सहकार्याने होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या शिबिरात केएलई रक्तपेढी, बीम्स रक्तपेढी, महावीर रक्तपेढी, बेळगाव रक्तपेढी सहभागी होणार असून या संस्था रक्ताचा साठा करणार आहेत. संकटकाळात रक्ताची गरज भासल्यास अशा व्यक्तींना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलतांना जितो हेल्थ केअर विभागाचे समन्वयक हर्षवर्धन इंचल म्हणाले की, तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे. एका व्यक्तीने रक्तदान केल्यास तीन जीव वाचू शकतात. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी १ वर्षाच्या कालावधीसाठी रु. १ लाख पर्यंत. मर्यादित जनता वैयक्तिक अपघात (अपघात विमा) पॉलिसी दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रक्ताचे एक युनिट ३ जीव वाचवते आणि रक्ताची नेहमीच गरज भासते. त्यामुळे आपण बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या विशाल रक्तदान शिबिरात स्वेच्छेने पुढे येऊन हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जितो एपेक्सचे समन्वयक विक्रम जैन, केएलई रक्तपेढीचे अधिकारी श्रीकांत विरगी यांची भाषणे झाली. पत्रकार परिषदेत नितीन पोरवाल मुख्य सचिव जितो, कार्यक्रम संयोजक विजय पाटील, कुंतीनाथ कलमनी, अभय आदिमनी सदस्य जितो बेळगाव आदि उपस्थित होते.
0 Comments