- महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचे नागरिकांना आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा आणि अविघटनशील घातक कचरा असे वर्गीकरण करूनच तो महापालिकेच्या कचरा संकलित करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना द्यावा. यामुळे घनकचरा विल्हेवाटीची योग्य अंमलबजावणी होईल. तसेच बेळगाव शहर स्वच्छ शहर होईल होण्याकरिता कचरा विल्हेवाटीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना केले आहे.
नियम २०१६ प्रभागनिहाय आवश्यकतेनुसार, निवासी भागात सकाळी आणि व्यावसायिक भागात संध्याकाळी कचरा उचलण्यासाठी वाहने नियुक्त केली आहेत आणि जनता आपला दैनंदिन कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या वाहनांना देत आहे. त्यानुसार काही सार्वजनिक व व्यावसायिक दुकानमालक आपल्या घरातील किंवा दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागेवर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यावर आणि शहरवासीयांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.घनकचरा विल्हेवाट नियम २०१६ आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, सर्व जनतेला त्यांचा दैनंदिन कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. ओला कचरा, सुका कचरा आणि अविघटनशील घातक कचरा वेगळा करून सफाई कर्मचाऱ्यांना द्यावा.
महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या खासगी मोकळ्या जागेची साफसफाई मालकाने स्वतः करावी.अन्यथा या खाजगी जागांची महापालिका स्वच्छता करणारा असून त्याचा खर्च मालकाकडून वसूल केला जाईल अशा सूचनाही या प्रसिद्धीपत्रकात महापालिका आयुक्तांनी नमूद केल्या आहेत.
0 Comments